परभणी (प्रतिनिधी) जिंतूर ते मंठा या राज्य मार्गावर गणेशपुर जवळ दोन वाहनांच्या समोरासमोर भीषण धडकेत परभणी येथील जेष्ठ पत्रकार नितीन धूत व सहकार विभागातील जिंतूर चे सहाय्यक निबंधक संजय अब्दागिरे या दोघांचा मृत्यू झाला तर विजय ताडकळसकर व अॅड मनोज तोष्णीवाल हे दोघे जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगर येथून हे चौघे परभणीकडे येत होते. त्यावेळी रात्री अडीचच्या सुमारास गणेशपुरी फाट्याजवळ दोन वाहनाची समोरासमोर धडक झाली त्या धडकेत धूत व अब्दागिरे हे दोघे गंभीर जखमी झाले महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य तथा भाजपचे नेते डॉक्टर केदार खटिंग, अद्वैत पार्डीकर या दोघांनी या अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली व रुग्णालयापर्यंत पोहोचले. परंतु उपचारापूर्वीच धूत यांचे निधन झाले तर अब्दागिरे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
दरम्यान ताडकळसकर व तोष्णीवाल यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या दोघांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती हाती आली आहे. ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत व संजय अब्दागिरी यांच्या निधनाबद्दल दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


