परभणी ( प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या वतीने शहर फिरण-र्या मोकाट श्वानांना प्रतिबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी आतापर्यंत एकुण 26 मोकाट श्वांन जेरबंद करून त्यांच्यावर कार्यवाही केली.
परभणी शहर महानगरपालिकेने कोंडवाडा विभागार्तंगत मोकाट श्वानांना पकडण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. काल मा. महापौर सय्यद इकबाल व उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितिनजी नार्वेकर यांनी सदर पथकाच्या गाडीस हिरवी झेंडी दाखवून या मोहीमेचा शुभारंभ केला होता. त्यांचा पहिल्याच दिवशी आठ श्वानांना जेरबंद केले तर आज दि. 17 मार्च रोजी 18 श्वानांना पकडून कारवाही करण्यात आली. या पकडलेल्या श्वानांची नसबंदी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच शहरातील मोकाट श्वाने संपत नाहीत तोपर्यंत हि मोहीम सुरूच राहणार आहे. सदर मोहीम कोंडवाडा प्रमुख विनय ठाकुर यांच्या सह पथकातील कर्मचारी राबवित आहेत.


