व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी जाहीर
परभणी,(प्रतिनिधी) पत्रकारांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची परभणी जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. जिल्हाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून बालासाहेब काळे आणि गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

अवघ्या पाच वर्षात जगातील तब्बल 78 देशात विस्तारलेल्या या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी राज्याचे कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या उपस्थित बुधवार (दि.15) परभणीत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्याचे सहसरचिटणीस सुरज कदम यांनी काम पाहिले. यावेळी राज्य सहसंघटक विजय पाटील,मराठवाडा कार्यकारीणी सदस्य विशाल माने, प्रवीण चौधरी,सुरेश जंपनगिरे यांच्यासह राज्य कार्यकारिणीतील नूतन संघटक आणि मावळते जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाध्यक्ष पदाची मुख्य जबाबदारी कैलास चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली. परभणी जिल्ह्याचा विस्तीर्ण भौगोलिक रचनेचा विचार करून दोन भागात प्रभावी संघटनात्मक विभागणी करण्यात आली. यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून बालासाहेब काळे यांच्याकडे पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू या चार,तर गणेश पाटील यांच्याकडे सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
उर्वरीत कार्यकारिणी या याप्रमाणे,
जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जुंबडे, कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी,सरचिटणीस श्रीकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मंचकराव देशमुख, सय्यद युसुफ, शिवाजी वाघमारे, राजन मंगरूळकर, शेख अन्वर लिंबेकर,सहसरचिटणीस सुधीर बोर्डे,कोषाध्यक्ष दिवाकर माने,कार्यवाहक दिलीप बोरुळ, दत्तात्रय कराळे,संघटक अमोल लंगर, लक्ष्मण कच्छवे,आनंद ढोणे,मधुकर खंदारे,प्रवक्ता लक्ष्मीकांत रासवे,प्रसिद्धीप्रमुख सोमनाथ स्वामी सदस्य विनायक देसाई,विठ्ठल भिसे,प्रदीप कांबळे यांची निवड झाली आहे.महानगर कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून नरहरी चौधरी, कार्याध्यक्ष विष्णू सायगुंडे, सरचिटणीस संतोष गवळी, संघटक अनिल अहिरे, कार्यवाहक रियाज कुरेशी, कोषाध्यक्ष गजानन साबळे,प्रवक्ता नंदकिशोर सुगंधे, सदस्य अर्जुन जाधव, माबुद खान, बाळू घिके, सय्यद जमील,गणेश रेंगे,शैलेश काटकर यांची निवड झाली आहे.
यावेळी विजय चोरडिया, सुरज कदम आणि विजय पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या बैठकीस संतोष मगर,ज्ञानेश्वर उंडाळ,भास्कर लांडे,नारायण सोनटक्के,दिपक कच्छवे,अंकुश कांबळे,देवानंद गुंडाळे,संजय घनसावंत यांची उपस्थिती होती.
…….चौकट…
गजानन देशमुख यांची प्रदेश संघटकपदी वर्णी
मावळते जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांची नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आणि राज्य संघटक म्हणून निवड करण्यात आली. त्यांना प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी नियुक्तीपत्र देत त्यांचा सत्कार केला.
संघटनेत विधायक कामावर भर- विजय चोरडिया
यावेळी बोलताना विजय चोरडिया म्हणाले,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप काळे यांच्या अथक परिश्रमातून जगभरात नावारूपाला आलेल्या संघटनेत विधायक कामावर भर दिला जात आहे. पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण तसेच घरांचा प्रश्न यावर संघटना काम करत आहे.
पत्रकारांच्या कल्याणासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. आगामी काळात देखील विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. परभणी जिल्हा संपूर्ण राज्यात विधायक उपक्रमात अग्रेसर राहिला पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे असे आवाहन यावेळी श्री चोरडिया यांनी केले.


