परभणी,( परभणी) पिक विम्याची रक्कम 15 दिवसात मिळाली पाहीजे अन्यथा आंदोलन करु असा इशारा आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिला आहे.कोरड्या अवस्थेतील पिक कापणी प्रयोगाचा अहवाल कंपनीला तातडीने देऊन कारवाई करा अशा सुचना आ.पाटील यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना केल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, संबंधित पिक विमा कंपनीने शासनाच्या काही पीक कापणी धोरणाचा गैरफायदा उचलला आहे. पीक कापणी प्रयोग करताना 2025 मध्ये सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यात पाऊस असल्याने जमिनीत पाणी होते, पिकेही ओली होती, यामुळे शासनाने ओल्या पिकांसोबतच कोरड्या पिकांचे देखील पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरणाच्या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे कंपनीने याचा गैरफायदा घेत चुकीचा अर्थ काढत तांत्रिक बाब समोर करत दोन अहवाल कसे काय ? हा मुद्दा उपस्थित करत परभणी जिल्ह्याचा पिक विमा मंजूर केला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी पिक विम्याच्या भरपाई पासून वंचित आहेत. वास्तविक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पिक विमा कंपनीने तांत्रिक बाब पुढे करत पळवाट काढली आहे, यामुळे आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना पिक विमा कंपनीला अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरड्या पीक कापणीचा अहवाल ग्राह्य धरा आणि लवकर पिक विमा भरपाई द्या याबाबत तातडीने अहवाल द्या अशा सूचना आमदार पाटील यांनी केली आहे. अन्यथा पंधरा दिवसात परभणीत तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला आ.पाटील यांच्या इशारा नंतर जिल्हा प्रशासन तातडीने अहवाल पाठवेल व शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


