परभणी,(प्रतिनिधी) : येथील क्रांती चौकातील ज्येष्ठ नागरीक श्रीमती सुनंदा रेणुकादास सरदेशपांडे यांचे आज सोमवार रोजी सायंकाळी 4.50 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. विशाल सरदेशपांडे, विक्रम सरदेशपांडे व सरदेशपांडे हुर्डा पार्टीचे संचालक सचिन सरदेशपांडे ही तीन मुले व स्वप्ना ही मुलगी, सूना व सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान, श्रीमती सरदेशपांडे यांच्या पार्थीवावर मंगळवार 28 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


