परभणी (परभणी) शहरातील गांधी पार्क येथील ज्येष्ठ नागरिक तथा सेवानिवृत्त शिक्षक सूर्यप्रकाश देशपांडे – चांदवडकर (वय 83) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी दिनांक 27 रोजी रात्री आठच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी दहा वाजता जिंतूर रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना, तीन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
देशपांडे यांना अध्यात्मिक क्षेत्रात मोठी रुची होती.विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. जिल्हा परिषदेच्या विविध शाळांतून त्यांनी सेवा बजावताना विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. जगदीश देशपांडे व पत्रकार प्रवीण देशपांडे यांचे ते वडील होत. देशपांडे कुटुंबीयांवर कोसळलेला दुःख दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


