परभणी (प्रतिनिधी) पोलीस स्टेशन नानलपेठ यांच्या हद्दीत बेवारस स्थितीत मिळून आलेल्या व डिटेन करण्यात आलेल्या एकूण २४ दुचाकी मोटारसायकल वाहनांच्या जाहीर लिलावास तालुका दंडाधिकारी, तहसील कार्यालय परभणी यांच्याकडून परवानगी प्राप्त झाली आहे.
सदर बेवारस दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव तालुका दंडाधिकारी परभणी, उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.
या अनुषंगाने नागरिकांना कळविण्यात येते की, सदर वाहनांचा जाहीर लिलाव दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस स्टेशन नानलपेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
*-*-*-*-*


