परभणी, (प्रतिनिधी) : शहरातील मल्हार नगर परिसरातील विवाहित महिला घरातून बाहेर गेल्यानंतर परत न आल्याने तिच्या पतीने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
याबाबत रोहित शिवाजीराव खुणे (वय २४, रा. मल्हार नगर, परभणी) यांनी दि. ८ जून २०२६ रोजी नानलपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, पत्नी दिव्या रोहित खुणे (वय १९) ही दि. ८ जून रोजी दुपारी अंदाजे १.३० वाजण्याच्या सुमारास शिवलेले ब्लाऊज आणण्यासाठी जाते, असे सांगून घरातून निघून गेली. मात्र त्यानंतर ती परत घरी आली नाही. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
हरवलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : रंग गोरा, उंची अंदाजे ४ फूट, बांधा सडपातळ, चेहरा लांबट असून ती मराठी भाषा बोलते. घरातून बाहेर पडताना तिच्या अंगात पिवळ्या रंगाची साडी होती. सदर महिलेबाबत कोणास माहिती मिळाल्यास नानलपेठ पोलीस स्थानकाशी संपर्क करावा किंवा फोन क्र. ०२४५२-२२०४५०, मो. ९४२३९१०९०२ वर संपर्क क्रमांक करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी केले आहे.
*-*-*-*-*


