परभणी (प्रतिनिधी) वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी बहिरेपणाच्या समस्येने ग्रासलेल्या तरुणाची श्रवण शक्ती परभणीच्या आर.पी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे परत मिळाली.
परभणी येथील हा तरुण बऱ्याच दिवसांपासून कानातून पू व पाणी येणे, सतत कान दुखणे आणि हळूहळू ऐकू येणे, आयकू कमी येणे व नंतर काहीही न ऐकू येणे या त्रासाने त्रस्त होता.
दुर्बिणीतून (Endoscopy) कानाची तपासणी केल्यानंतर प्राथमिक समस्या स्पष्ट झाल्या.
श्रवण क्षमता तपासणीसाठी ऑडिओमेट्री विभागात तपासणी दरम्यान रुग्णाला फक्त १०% ऐकता येत असल्याचे निष्पन्न झाले.
वयाच्या विशी-पस्तिशीतच आलेल्या या गंभीर आजारामुळे आणि उपचारांच्या वाढत्या खर्चाला कंटाळून रुग्ण परभणीसह विविध बाहेरील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी फिरत होता; परंतु त्याला कुठेही पुरेसा दिलासा मिळाला नाही.
अखेर, आर.पी हॉस्पिटलचे नामवंत कान, नाक, घसा (ENT) तज्ज्ञ डॉ. मो. फैज उर रहमान यांनी या रुग्णास तपासले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
डॉ. फैज उर रहमान यांनी अत्यंत कुशलतेने ही क्लिष्ट शस्त्रक्रिया दोन टप्प्यांत यशस्वीरीत्या पूर्ण केली.
पहिल्या टप्प्यात एका कानाचे आजाराचे यशस्वी निदान करून त्यात नवीन कृत्रिम कान पडदा बसविण्यात आला.
पहिला कान ठीक झाल्यानंतर दुसरा कानाच्या शास्तक्रियेचा टप्पा यशस्वी पार पडला, दोन्ही कानाच्या शस्त्रक्रिये मधे दोन महिन्यांचा काळ गेला ,दुसऱ्या कानाचे ऑपरेशन यशस्वी झाले.
दोन्ही ऑपरेशन्स अत्यंत गुंतागुंतीची आणि क्लिष्ट स्वरूपाची होती, परंतु डॉक्टरांच्या अचूक वैद्यकीय ज्ञान आणि आर पी हॉस्पीटल मधील अत्याधनिक यंत्राने सुसज्ज शस्त्रक्रिया याचा रुग्णाला फायदा झाला व दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या.
सामान्यतः अशा क्लिष्ट व दोन टप्प्यातील शस्त्रक्रियांसाठी रुग्णाला मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. मात्र, रुग्णाची आर्थिक परिस्थिती आणि तरुण वयात आलेले वैद्यकीय संकट लक्षात घेऊन, आर.पी हॉस्पिटलने ही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात पूर्ण करून एक आदर्श सामाजिक जाणीव जोपासली आहे.
यामुळे सर्वसामान्य घटकातील रुग्णांनाही उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध केल्यामुळे त्यांनी आ डॉ राहुल पाटील यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.
आर पी हॉस्पीटल चे प्रमुख आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले की
“परभणी शहरात अशा प्रकारच्या उच्चस्तरीय शस्त्रक्रिया अत्यंत अल्प दरात उपलब्ध करणे हे सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे व आर.पी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर लोकांचे कर्तव्य आहे, समाजातील दुर्लक्षित रुग्णाला अंधारातून बाहेर काढून त्याला नवीन आयुष्य देण्याचे मोलाचे कार्य या हॉस्पिटलने केले असून, या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.


