परभणी (प्रतिनिधी) येथील वसमत रस्त्यावरील गोदावरी हॉस्पिटल व स्कॉलर्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष ,तथा प्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. मधुसूदन मगर यांचे आज अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.
दरम्यान डाॅ. मगर त्यांच्या पार्थिवावर आज, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता परभणी येथील जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


