परभणी (प्रतिनिधी) मराठवाड्यातील व परभणी जिल्ह्यातील पहिल्या एम. एस. नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तथा ज्येष्ठ समाजसेविकाआशाताई दत्तात्रय मगर यांचे आज पहाटे राहत्या निवासस्थानी वृद्धपकाळामुळे निधन झाले. मृत्यू समयी त्या 83 वर्षांच्या होत्या.
दरम्यान त्यांच्या पार्थिवावर जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
परभणीचे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.दत्तात्रय मगर यांच्या त्या पत्नी, डॉ. प्रसाद मगर व सौ. हर्षा माकोडे, सेलू यांच्या मातोश्री होत्या. परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय,सामाजिक क्षेत्रात डॉक्टर आशाताई मगर यांचे मोठे योगदान होते. अत्यंत शांत मनमिळावू व तळमळीने काम करणाऱ्या डॉक्टर मगर या विविध संघटना प्रतिष्ठानशी संलग्न होत्या.
दैनिक लोकसंचार परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


