परभणी,(प्रतिनिधी) : सामाजिक, शैक्षणिक तसेच महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. संप्रीया राहुल पाटील यांना ‘नॅशनल एक्सलन्स अॅवार्ड 2026’ या राष्ट्रीय पुरस्काराने राज्यपाल जीष्णू देव वर्मा यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वर्मा फाऊंडेशन आणि मैत्री पीस फाऊंडेशनच्या वतीने आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. संप्रीया पाटील या शिक्षण क्षेत्रातील योगदानासोबतच महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत. महिला पतसंस्था आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच “यशस्विनी महिला मंच’च्या माध्यमातून बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी केलेल्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून या सन्मानाकडे पाहिले जात असून, पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून डॉ. संप्रीया पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


