परभणी,(प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी परभणी शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि.29) शहर जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस अकबर भैय्या जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवर काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रभारी भगवान पंडागळे, अमोल देशमुख, अभय देशमुख, सचिन जवंजाळ, अजय कदम, डिगंबर खरवड, सुमध मगरे, अरफात काझी, हबीब खान, दानिश खान, शब्बीर बॉड, सय्यद उस्मान, सय्यद सलीम यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


