परभणी,(प्रतिनिधी) : शेतात बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळून आल्याने धसाडी परिसरात खळबळ उडाली. दैठणा पोलिसांनी गुरुवारी (दि. 1) सकाळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तब्बल 153 किलो गांजा जप्त केला असून, याप्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 76 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दैठणा पोलिसांना धसाडी परिसरात एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सकाळी संबंधित ठिकाणी कारवाई केली. पाहणीदरम्यान गांजाची झाडे आढळून आल्यानंतर पोलिसांनी ती ताब्यात घेत वजन केले असता एकूण 153 किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक एन. एल. रिठे, सहायक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत, पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार यांच्यासह हवालदार विठ्ठल कुंडगीर, ज्ञानेश्वर चोपडे, विनोद मुळे, अमोल डुबे, संजय सानप, लक्ष्मीकांत कश्यप, अशोक रसाळ तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दैठणा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Saturday, October 3
ताज्या बातम्या:
- ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; चौथ्या दिवशी ३१ इच्छुकांनी घेतले ५९ नामनिर्देशन पत्रे; १० उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल
- धसाडी परिसरात 153 किलो गांजा जप्त : शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड; एकास पोलिसांनी घेतले ताब्यात
- वडगाव जि. प. शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला ध्यान-योगाचा आनंद; सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
- ऑटो एलपीजी उद्योग वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस धोरणात्मक पावले उचलावीत; नितीन सोळंके ची मागणी
- बाल विद्यामंदिर हायस्कूलच्या प्रवीण सोनोने यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न
- विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत ओजस्विता राहुल पाटीलचे सुवर्णयश; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र
- दुष्काळी पंचनामे वेगाने; प्रशासन अलर्ट मोडवर : परभणी जिल्ह्यात पीक परिस्थितीचा प्रशासनाकडून आढावा
- सेवा संकल्प अभियान; कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पोषण, बालविवाह व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन


