छत्रपती संभाजीनगर:- ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी ३१ इच्छुक व्यक्तींना एकूण ५९ कोरे नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, आज दुपारी ३ वाजेपर्यंत १० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
आज नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये श्रीधर नारायण साळवे (भीमसेना), संजीवनी मदन टेकाळे (अपक्ष), नामदेव केरबा वाघमोडे (अपक्ष), अकील अहमद शेख (आम आदमी पार्टी), अॅड. अंबादास जाधव (अपक्ष), अविनाश बंडू गोरे (अपक्ष), पाटील कसारे रमेश विनायकराव (अपक्ष), शेख अब्दुल मलिक अब्दुल खुद्दुस (राष्ट्रीय समाज पक्ष), संजीवनी मदनराव टेकाळे (स्वराज्य निर्माण सेना) आणि कृष्णा त्रिंबकराव पवार (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणूक कार्यालयाच्या नोंदीनुसार या उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज व संबंधित तपशील नोंदविण्यात आले आहेत.
आजअखेर एकूण ९७ इच्छुक व्यक्तींना १७४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले असून, एकूण १२ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
*******


