परभणी, (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत आयोजित सोलापूर झोनल बुद्धिबळ स्पर्धेत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.या स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले. तसेच मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे महाविद्यालयाच्या रितेश राहुल कावूतकर आणि कृष्णा सुनील व्हडगीर यांची मुलांच्या सोलापूर विभागीय संघात, तर कु. कल्पना मेघश्याम पत्की हिची मुलींच्या सोलापूर विभागीय संघात निवड झाली. त्यामुळे महाविद्यालयाच्या तीन खेळाडूंना विभागीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या खेळाडूंना क्रीडा प्रमुख प्रा.अरविंद लोहट यांचे मार्गदर्शन लाभले.
उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने विजयी संघ व निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. रणजीत काकडे, श्री. केशवआण्णा दुधाटे आणि संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


