परभणी (प्रतिनिधी) नवरात्र उत्सवास आज पासून सुरुवात झाली असून येथील इंद्रायणीच्या माळावर प्रसिद्ध इंद्रायणी देवीच्या मंदिरात आज नवरात्रनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.
इंद्रायणी देवीची घटस्थापना सौ मेघा मोहनराव फड यांच्या हस्ते, चिरंजीव आकाश फड यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी पुजारी अमोल कुलकर्णी, दत्तराव जाधव, कोंडीराम जाधव, अवधूत जाधव, सुनील जाधव, माऊली जाधव, तुकाराम जाधव ,आनंदा जाधव, रमेश जाधव,राहुल जाधव ,महेश जाधव, मोरेश्वर जाधव, प्रसाद जाधव, राजेभाऊ जाधव समस्त भोसा गावकरी मंडळी उपस्थित होते.


