परभणी,(प्रतिनिधी) : ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार दुय्यम न्यायालयांतील कर्मचार्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचार्यांनी शनिवार 17 ऑक्टोबर रोजी येथील आंदोलन मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.
मुंबई उच्च न्यायालयाने दुय्यम न्यायालयांतील कर्मचार्यांना सुधारित वेतनवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठविला आहे. मात्र, 20 महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. या प्रस्तावाला मंजुरी देऊन सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, तसेच प्रलंबित मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले.


