गंगाखेड (प्रतिनिधी) येथील गोदातटावर नगरसेवक तथा गटनेते क्षितिज चौधरी आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित ‘कोजागिरी संध्या’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून हजारो विद्यार्थी व नागरिकांच्या साक्षीने हा सुंदर सांस्कृतिक सोहळा अनुभवला. यावेळी खासदार संजय जाधव, मा.आ.डॉ.मधुसूदन केंद्रे साहेब, महापौर सय्यद इक्बाल यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील आणि आमचे मित्र, सुप्रसिद्ध गायक राजू काजे यांनी आपल्या कलेतून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक सोहळ्याला समाजहिताची जोड देत आयोजित केलेले रक्तदान शिबिर आणि नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली ३०० हून अधिक मोफत एसटी स्मार्ट कार्डे! मनोरंजनासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
सुंदर आयोजनाबद्दल अभिनंदन तसेच वाढदिवसानिमित्त क्षितिज यांना निरोगी, आनंदी आणि यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! गोदाकाठावरची ही चांदण्यांनी सजलेली संध्या, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कलेचा आनंद मनात कायम स्मरणात राहील.


