परभणी,(प्रतिनिधी) : सुप्रसिध्द जीवन प्रबंधन विशेषज्ञ तथा आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता नारीशक्ती पुरस्कार प्राप्त ब्रम्हकुमारी शिवाणी दीदीजी यांचे 16 नोव्हेंबर रोजी परभणीत ‘खुशियों का पासवर्ड’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयासमोरील अश्वमेध कार्यालयासमोर सायंकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार असून तत्पुर्वी सांस्कृतिक कार्यक्रम 5.30 ते 6 या वेळेत व 6 वाजता शिवाणी दीदी यांचे मुख्य प्रवचन होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर नागरीकांनी या व्याख्यानास उपस्थित रहावे, असे आवाहन शिवराम नगर येथील ब्रम्हकुमारीज यांनी केले आहे.


