परभणी (प्रतिनिधी) वसंत आश्रम शाळा, कारेगाव येथे देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. जाधव सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लेडे मॅडम, मोपकर सर आणि निर्वळ सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेच्या पूजनाने झाली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भाषणे झाली. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशसेवेतील योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र जुनघरे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. गजानन मुडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. राम गारकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री. इंगळे सर, राठोड सर, श्री. कच्छवे सर, रोडे सर, रेडेवाड सर आणि श्री. खिराडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
: भारताचलोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार सतीश रेड्डी व जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक रोहित जैस्वाल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थिती होते.
००००००


