परभणी (प्रतिनिधी) परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार सहा नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी सहा वाजता राजगोपालचारी उद्यान येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.उपआयुक्त प्रज्ञावंत कांबळे, उपआयुक्त तुकाराम कदम,मख्य लेखाधिकारी दाते तसेच सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजूलाला यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गायक श्रीधर फडके,गायिका सौ शेफाली कुलकर्णी साकुरीकर,सौ आसावरी बोधनकर,वादक तबला तुषार आग्रे, सुर्यवंशी बासरी आदित्य गोगटे,तालवाद्य नीलेश पाठक, निवेदिका सौ सुकन्या जोशी यांची उपस्थिती राहणार आहे.
याशिवाय स्थायी समिती सभापती सौ. प्रतिभाताई अतुल सरोदे, प्रभाग समिती सभापती रईस खान, मुसद्दीक खान, तबस्सुम वसीम शेख, समाज कल्याण समिती सभापती राजेश रणखांबे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. अश्विनी अमोल जाधव, बांधकाम समिती सभापती सायरा बेगम अलीमोहीन, आरोग्य समिती सभापती अबोली कांबळे, विधी व अर्थ समिती सभापती रुखसाना बेगम हमीद जहागीरदार, शहर सुधार समिती सभापती सौ. शुभांगी शुभम पाष्टे, आणि शिक्षण समिती सभापती सौ. शमशाद बेगम सय्यद इलाही यांची उपस्थिती राहणार आहे.
शहरातील नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले आहे.


