परभणी :(प्रतिनिधी) उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी परभणी महानगरपालिका कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर सय्यद इकबाल सय्यद ख्वाजा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. या भेटीदरम्यान महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवरांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान, आमदार प्रवीण स्वामी यांनीही महापौर सय्यद इकबाल यांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चेत परभणी शहराच्या विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव सहकार्य करू, असे आश्वासन आमदार स्वामी यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी सभागृह नेते सय्यद समीर ऊर्फ माजला, गटनेते दिलीप ठाकूर, माजी सभापती अतुल सरोदे, समाजसेवक सय्यद कादर, समाजकल्याण सभापती राजेश रणखांबे, शरफोद्दीन सिद्दीकी, नगरसेवक व्यंकट डहाळे, श्याम खोबे, शरफोद्दीन सिद्दीकी, शंकर आजेगावकर, शुभम पाश्टे, मिलिंद घागरमाळे, शेख हुसेना बानो, शेख हबीब, मोहम्मद इब्राहिम बागवान, अनिल डहाळे, नारायण अवचार, सुलोचना भालेराव, डॉ. अनिल कांबळे, अर्जुन गुजर, तांबोळी, जावेदहा परवीन, अ. हमीद, अलीम कुरेशी, विकास राजापुरे आदींची उपस्थिती होती.
या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने परभणी शहराच्या विकासासाठी परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.


