परभणी,(प्रतिनिधी) : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे गुरुवार 19 नोव्हेंबर रोजी परभणी जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी परभणी दौर्यावर येणार आहेत. यावेळी ते पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकून घेणार आहेत.
या दौर्यादरम्यान नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी दुपारी 3 ते 4.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना आपल्या समस्या किंवा तक्रारी मांडायच्या आहेत, त्यांनी निर्धारित वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.
Wednesday, November 18
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्ह्यातील 450 कार्यरत तसेच सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; जिल्ह्यातील चारही संवर्गांचा 100 टक्के सहभाग
- अंमली पदार्थ विरोधी कारवाई – मौजे सुपा येथे २६ किलो गांजा जप्त; १३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
- 100 खाटांचे आयुष हॉस्पिटल, वारकरी भवनासाठी जागा, रस्ते व चौकांच्या नामकरणाचे ठराव मंजूर, मनपा सर्वसाधारण सभा
- परभणी महापालिकेच्या अभय योजनेला १६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; घरपट्टीधारकांना विलंबशास्तीच्या १०० टक्के सवलतीचा लाभ घेण्याची संधी
- पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप उद्या परभणीत; नागरिकांच्या तक्रारी ऐकणार
- दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा पिकांची लागवड करा – जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण
- जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा : जनगणनेचे काम जबाबदारीने अचूकपणे व वेळेत पूर्ण करा :जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण
- आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी परभणीत सोमवारी भरती मेळावा : नामांकित आस्थापनांचा सहभाग


