परभणी,(प्रतिनिधी) : भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवार 29 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय परभणी मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
येथील स्टेडिअम मैदानावर सकाळी 7 वाजता या परभणी मॅराथॉनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांच्याहस्ते, महापौर सय्यद इकबाल, पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, आयुक्त नितीन नार्वेकर, जिल्हा क्रिडा अधिकारी कल्याण पोले, अॅड. अशोक सोनी, शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर या मॅराथॉनचा बक्षीस वितरण समारंभ सकाळी 9 वाजता जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आयोजक तथा असोसिएशनचे अध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, स्पर्धा समन्वयक प्रा.डॉ. माधव शेजूळ, पंचप्रमुख रणजित काकडे, तांत्रिक समिती प्रमुख डॉ. गुरुदास लोकरे यांनी दिली.


