
परभणी (प्रतिनिधी)- येथील वैभव नगरचे रहिवाशी हल्ली पुणे येथे वास्तवास असलेले वसंतराव प्रल्हाददेव वरूडकर- जोशी यांचे दि. 7 राजी रात्री 1.00 च्या सुमारास उपचारा दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे 83 वर्ष होते. त्यांच्या पश्त्यात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, नातू, तीन भाऊ , एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज मंगळवार दि 8 रोजी धायरी (पुणे) येथे दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.. बाल विद्यामंदिर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक विश्वंभर जोशी वरुडकर महावितरण चे श्रीकांत शास्त्री जोशी वरुडकर जिल्हा परिषद चे नंदकुमार जोशी वरुडकर यांचे ते वडील बंधू होत वरुडकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे


