परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालयात खो खो स्पर्धा पार पडल्या.14 17 आणि 19 वर्षे वयोगटातील स्पर्धेचे उद्घाटन म.न.पा. सहाय्यक प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळीका र्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे उपस्थित होते.या वेळी बोलताना कांबळे म्हणाले, मैदानी खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात खेळ खेळले पाहिजेत असे सांगत त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रा.डॉ. कोकीळ म.न.पा. क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, राजाभाऊ कामखेडे,प्रा. राजू रेंगे,जिजाऊ ज्ञानतीर्थ कैलास टेहरे, स्वीस अकॅडमी बालाजी मानोलीकर, अरबिंदो अक्षरज्योती तुकाराम शेजुळ, वरद विद्यालय कपिल निलवर्ण, आकाशकन्या निलेश राठोड, वसंतराव नाईक अमरदीप हत्तीअंबिरे, खो-खो असोसिएशन सचिव रणजीत जाधव बालविद्या मंदिर प्रभाकर गमे या मान्यवरांचा सत्कार म.न.पा. तर्फे करण्यात आला.
खो-खो स्पर्धेत लहान मुलांच्या गटात 11 शाळांनी सहभाग नोंदवला तर मुलींमध्ये नऊ शाळांनी सहभाग नोंदवला.
17 वर्षीय मुलांच्या गटात आठ शाळा तर मुलींच्या गटात पाच शाळा यांनी सहभाग नोंदवला. 19 वर्षे वयोगटात मुलांच्या गटात दोन मुलींमध्ये दोन शाळांनी सहभाग घेतला. अशा एकूण सहाशे विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला छाया – उत्तम बोरसूरीकर)