पालम (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाने, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना पक्षनिरीक्षक परभणी सुभाष सोळुंके,संपर्कप्रमुख मा.सुरेशदादा जाधव, सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे, युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली
मयूर साहेबराव शिंदे यांची पालम युवासेना तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे शिवसेना पक्षनिरीक्षक सुभाष सोळुंके यांनी नियुक्ती पत्रक देऊन अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माधवराव कदम,व्यंकटराव शिंदे,महिलासेना जिल्हाप्रमुख जनाबाई मुंडे,गीताताई सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख एकनाथराव लोखंडे, चंद्रकांत पाटील सुर्यवंशी विधानसभा प्रमुख गंगाखेड, शिवाजीराव शिंदे विधानसभा समन्वयक, रमेश सातपुते तालुकाप्रमुख गंगाखेड, भाऊसाहेब पौळ तालुकाप्रमुख पालम, प्रकाशराव कराळे तालुकाप्रमुख पूर्णा, विशाल किरडे शहरप्रमुख पूर्णा,अर्जुन पूर्णाळे शहरप्रमुख गंगाखेड, तसेच गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.