परभणी,( प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने बुधवारी (दि.09) मुंबईतून काही विधानसभा मतदारसंघांतर्गत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली यात परभणी मतदारसंघातून माजी उपमहापौर सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजू लाला यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
आज बुधवार (दि.9) मुंबईतून दुसरी यादी जाहीर केली. त्या यादीतून या आघाडीने माजी उपमहापौर माजू लाला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. गेल्या चार महिन्यांपूर्वीच माजू लाला हे शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झाले होते. परंतु, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजू लाला यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे परभणी मतदान संघात आता चर्चा होत आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


