परभणी (प्रतिनिधी) अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2024 -26 च्या कार्यकारिणीच्या सरचिटणीस पदी येथील प्रा.सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2024-26 करिता निवडणुकीचा कार्यक्रम 1 सप्टेंबर 24 रोजी जाहीर झाला होता. आज नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यध्यक्ष पदासाठी शिवराज काटकर (सांगली ), सरचिटणीस पदासाठी प्रा.सुरेश बा. नाईकवाडे या दोघांचे प्रत्येकी एक एक नामनिर्देशपत्र दाखल झाले त्या मुळे दोघांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली. प्रा . सुरेश नाईकवाडे हे मागील दहा वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदे वर राज्य निवडणूक प्रमुख, प्रदेश उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आदी पदावर कार्यरत होते. परभणीत मागील 30 वर्षापासून विविध दैनिकात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.विविध सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले प्रा. नाईकवाडे हे शिक्षण,क्रीडा, रेल्वे, वृक्षरोपन, सांस्कृतिक तसेच स्वछता चळवळीत उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांच्या बिनविरोध निवडीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, परिषदेचे अदयक्ष मिलिंद अष्टीवकर, जेष्ठ पत्रकार डॉ.आसाराम लोमटे, प्रवीण देशपांडे, परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अद्यक्ष राजकुमार हट्टेकर, कार्याध्यक्ष प्रभू दिपके, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण मानोलीकर, विठ्ठलराव वडकुते, बंडू बनसोडे,सुधाकर श्रीखंडे,धाराजी भुसारे, मो.एलयास, माजिद भाई, सतीश टाकळकर,शिवमल्हार वाघे, मोईन खान, अनिल दाभाडकर, महानगरचे कार्याध्यक्ष शिवशंकर सोनवने,पांडुरंग अंबुरे, संघपाल अडागळे यांच्या सह जिल्हा पत्रकार संघ, महानगर पत्रकार संघ, डिजिटल मीडिया शाखेच्या वतीने अभिनंदन केले आहे.