परभणी,(प्रतिनिधी) : येथील स्टेशन रस्त्यावरील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील 52 विद्यार्थीनींना भारतीय स्टेट बँकेच्या सीएसआर फंडातून सायकल वितरीत करण्यात आल्या.
प्रशालेच्या सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती आशा गरुड तर प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे आरबीओ कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक विनीत पाटील, व्यवस्थापक संदीप जोगदंड, हृदयरोग तज्ञ डॉ. रामेश्वर नाईक, शिक्षणाधिकारी योजना संजय ससाने, किशन इदगे, भालेराव, जी. टी. कुलदीपक, शंकर फुटके आदींची उपस्थिती होती. यावेळी 52 विद्यार्थ्यांना एसबीआय बँकेकडून आरबीओ कार्यालयाच्या सीएसआर फंडामधून सायकल वाटप करण्यात आले आहे.
प्रशालेच्या धारक विद्यार्थ्यांपैकी नंदिनी भोरे, प्राजक्ता, साक्षी मस्के, शिवानी अनुष्का पंडित, संध्या काकडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वप्नाची सायकल आम्हाला मिळत आहे, त्याचा खूप आनंद होतो आहे, असे मत व्यक्त केले. शाला व्यवस्थापन समिती सदस्य पंडित यांनी सुद्धा सभा आपले मत मांडत या प्रशालेत सर्व माझ्या मुली शिक्षण घेत असून शाळेच्या गुणवत्तेबद्दल आणि शिक्षकांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन सुधीर सोनुनकर यांनी केले. प्रास्ताविक कल्याण शिंदे यांनी तर आभार संध्या जोशी सुपेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक कल्याण शिंदे, सुधीर सोनुनकर, संध्या जोशी, कल्पना हेलसकर, योगिता धोकटे, शिल्पा प्रधान आदींनी परिश्रम घेतले.