परभणी,(प्रतिनिधी) : आज दुपारी निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य यंत्रणांनी शहरासह जिल्ह्यात छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांसह मित्रमंडळ व संस्थांनी ठिकठिकाणी उभारलेले हजारो होर्डिग्ज हटविण्याची मोहिम युध्द पातळीवर हाती घेतली आहे.
शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी, रस्ते, मुख्य चौकांमधून बेसुमार होर्डीग्ज उभारले गेले होते. यामुळे प्रमुख रस्ते व मुख्य चौक होर्डीग्जच्या विळख्यामुळे अक्षरशः लूप्त झाले होते. परंतु, या होर्डीग्जधारकांविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेसह सरकारी यंत्रणेने कोणतीही कारवाई लगेचच करावयाचे धाडस दाखविले नाही. त्याचा परिणाम असा, रस्त्याच्या दुतर्फासुध्दा खड्डे खोदून, बल्ल्या रोवून काही धुर्त नेतेमंडळींनी, कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यांपर्यंतसुध्दा होर्डिग्ज उभारण्याची स्पर्धा सुरु केली. रस्त्याच्या दुभाजकांमधील पोलवरसुध्दा छोट छोटे होर्डीग्ज व झेंडे लावल्या गेले. त्यामुळे मुख्य चौक व रस्ते अक्षरशः विद्रुप झाले.
किळसवाण्या या प्रकाराविरोधात जागरुक नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी, कार्यकर्त्यांनी त्या नाराजीकडे कानाडोळा करीत सोमवारी पहाटेपर्यंत होर्डीग्ज उभारण्याची स्पर्धाच लावली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर, वसंतराव नाईक यांचा पुतळा परिसर, राजगोपालाचारी उद्यानापासून संपूर्ण वसमत रस्ता, जिंतूर रस्ता या दोन्ही रस्त्यावरील दुभाजक, तसेच मध्यवस्तीतील बहुतांशी सर्वच चौक व रस्त्या रस्त्यांवर जागोजागी हे होर्डीग्ज उभारल्या गेले. हे सारे होर्डीग्ज निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याबरोबर हटविली जाणार हे स्पष्टच होते. त्या प्रमाणे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता निवडणूक आयोगाद्वारे निवडणूकीचा कार्यक्रम पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केला जाईल, पाठोपाठ आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल, असे स्पष्ट संकेत मिळाल्याबरोबर जिल्हा प्रशासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणांना हे सारे छोटे-मोठे होर्डिग्ज व झेंडे हटविण्याचे निर्देश दिले. अन् पाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत स्वच्छता विभागाने वाहने घेवून होर्डीग्ज व झेंडे हटविण्याची मोहिमच सुरु केली. मंगळवारी सायंकाळपर्यंत परभणीतील जिंतूर रस्ता व वसमत रस्त्यावरील बहुतांशी होर्डीग्ज हटविल्या गेले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील होर्डीग्ज हटविण्याचे कामही पूर्ण झाले होते.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही