तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न
जिंतूर( प्रतिनिधी) आज सेलू तालुक्यातील आम्रवन महाविहार देवगाव फाटा येथे वर्षावास समाप्तीचे औचित्य साधून आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या स्वयं कल्पनेतून साकार झालेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा व धम्मदेशना कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमास लॉंग मोर्चाचे प्रणेते प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी उपस्थित अनुयायांना मोलाचे मार्गदर्शन करत तथागतांची शिकवण अंगीकारावी असे आवाहन करत उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की तथागत गौतम बुद्ध व उपस्थित भिक्कु संघाचा आशीर्वाद कायम आ. बोर्डीकर यांच्या पाठीशी भरभरून राहील, कारण त्यांच्या संकल्पनेतून हे घडलेले पावन कृत्य समाज कधीही विसरणार नाही.
आ.बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी तथागताची दया करुणा व शांती प्रत्येकांनी अंगीकारली पाहिजे, राजकारण करतांना खुद्द वडिलांनी ग्रामीण भागात भावी पिढीस डॉ.बाबासाहेबांची प्रेरणा,ऊर्जा सर्वांना भेटावी म्हणून त्यांचे पुतळे उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले.तसेच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणेची सदैव आठवण ठेवत सर्व जातीधर्माना सोबत घेऊन सर्वांगीन विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
तथागत गौतम बुद्धांची शिकवण दया,करुणा, शांती ही बहुमूल्य शिकवण प्रत्येकांनी आपले जीवन सुखी होण्यासाठी अंगिकरावी असे आव्हान आ. बोर्डीकांनी या वेळी केले.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या भाषणातून पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत आपल्या समाजाचा नेहमीच मोठा हातभार लागलेला आहे.यांची आठवण त्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त केली. बापा पुढे लेकीचे कौतुक ऐकले जावे यापेक्षा मोठे भाग्य नाही असे मत व्यक्त केले. आपली एकच राजकीय इच्छा राहिली, जी आपणास कधी लाभली नाही, आपल्या आशीर्वादाने दिदीला भक्कम साथ देत लेकीला मंत्री पद भेटावे ही अपेक्षा ठेवतो अशी भावनिक साद त्यांनी घातली.
या कार्यक्रमास मंचावर भदंत शरणानंद महाथेरो भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूज्य.भदंत संघरत्न,या सह असंख्य भिक्कु संघ उपस्थित होता.तसेच सुरेश भुमरे सह आत्माराम पवार,भगवान वटाणे,रवी घुगे,लक्ष्मण बुधवंत,गोविंद थिटे,रमण तोष्णीवाल,गोविंद दायमा,सुनील भोंबे,सुनील मते,कैलास खंदारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वाकळे सुमेध सूर्यवंशी,गुणीरत्न वाकोडे,विजय खंदारे,संदेश भालेराव, मुकुंद काळे, प्रतिक खिल्लारे, भगवान साळवे,रवी किरण गजभारे, राहुल शिंदेअमोल वाघ,भगवान साळवे, युवराज घनसावध व येशील व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकासांना मोरे यांनी केले.