परभणी (प्रतिनिधी) परभणी विधानसभा मतदार संघातून आ.डॉ.राहुल पाटील हॅट्रिक साधणार हे निश्चित आहे. त्यांचे मताधिक्य मागच्या वेळेस ८१ हजार होते यावेळेस ८१ हजाराहून १ लाखाच्या पुढे कसे जाईल यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खा. संजय जाधव यांनी केले. येथील अक्षदा मंगल कार्यालयात बुधवार, दि.२३ आॅक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता,पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. यावेळी खा. जाधव बोलत होते. यावेळी आ.डॉ. पाटील, शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. जाधव म्हणाले की, परभणी विधानसभा मतदारसंघात आम्ही मागील ३० वर्षांपासून हा शिवसेनेचा गड अभेद्य ठेवला आहे. यापुढे देखील तो अभेद्य राहणार यात शंका नाही. आ. डॉ.पाटील यांनी मागील १० वर्षांमध्ये परभणी मतदार संघात लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर प्रत्येक घरातील, कुटुंबातील सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनामनात आ.पाटील वसले आहेत. सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. निष्ठावंतांना न्याय मिळतो आणि हा न्याय ठाकरे यांची शिवसेनाच देऊ शकते हे सिद्ध झाले आहे. आम्हाला देखील शिवसेना फुटी नंतर मोठी आमिषे आली होती. परंतु आम्ही आमिषाला बळी न पडता निष्ठावंत राहिलो म्हणून मायबाप जनतेचा आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आ. पाटील यांचा विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. बुथनिहाय दिलेली जबाबदारी योग्य पार पाडावी. १०० टक्के मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यावे असे देखील खा. जाधव यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, मी जनतेचा सेवक म्हणून मागील १० वर्षापासून कार्यरत आहे. यापुढे देखील अशीच सेवा अविरत सुरू राहील. कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मला जे प्रेम दिले त्याची मी परतफेड कधीच करू शकणार नाही अशा भाऊक शब्दात आ. पाटील यांनी सर्व कार्यकर्ता पदाधिकाºयांचे आभार मानत यापुढे देखील अशीच साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी, शिक्षक सेना व सर्व सलग्न संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही