परभणी,(प्रतिनिधी) : एनव्हीएस मराठवाडा हायस्कूलचे राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)चे ऑफिसर शिरीष जयपूरकर यांचा जवाहन नवोदय विद्यालयात एनसीसीने आयोजित केलेल्या एटीसी कॅम्पमध्ये नियम वयोमानानूसार एनसीसीतून सेवानिवृत्तीबद्दल 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेडचे कमांडिंग ऑफिसर तथा कर्नल रंगाराव यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र प्रदान करुन यथोचित गौरव करण्यात आला.
यावेळी एओ तथा कर्नल दिलीप रेड्डी, मेजर प्रशांत सराफ, लेफ्टनंट जयकुमार देशमुख, फर्स्ट ऑफिसर सावळे, सेंकड ऑफिसर रंगनाथ राठोड, थर्ड ऑफिसर सौ. नवशिंदे हे उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या भाषणातून जयपूरकर यांनी एनसीसीत दिलेल्या अमूल्य योगदानाचे मुक्तकंठाने कौतूक केले. त्याचबरोबर एनसीसीचे सुभेदार मेजरसह सर्व परडे इन्स्ट्रक्टर व कार्यालयीन कर्मचारी तसेच कॅम्प्मधील 500 कॅडेट उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


