पाथरी,(प्रतिनिधी) : पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतीम मुदतीत म्हणजे सोमवारी (दि.04) 33 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता एकूण 14 उमेदवार निवडणुकीत रिंगणात राहिले आहेत. यामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, सईद खान व माधवराव फड या तीघांची उमेदवारी कायम राहिली आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघात 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 47 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 33 उमेदवारांनी सोमवारी रिंगणातून माघार घेतली. त्यामध्ये गोविंद मदन घांडगे (अपक्ष), गयाबाई माधवराव फड (अपक्ष), अलीशेर महेबुब पाशा (अपक्ष), दादासाहेब रामराव टेंगसे (अपक्ष), रवींद्र विठलराव देशमुख (अपक्ष), किरण राधाकिसन शिंदे (अपक्ष), रंगनाथ मोहनराव सोळंके (अपक्ष), नितीन रामराव लोहट (अपक्ष), मंचक सागरराव बचाटे (अपक्ष), बालासाहेब तुकाराम पौळ (अपक्ष), मिरा कल्याणराव रेंगे (अपक्ष), समीर गणेशराव दुधगावकर(अपक्ष), सचिन सुरेश निसर्गध (बहुजन रि.सो.पार्टी), अरुण सीतारामजी कोल्हे (अपक्ष), सर्जेराव बाजीराव फंड (अपक्ष), संजय किशनराव कच्छवे (अपक्ष), मोइज अन्सारी अब्दुल कादर (अपक्ष), मुंजा ज्ञानदेव कोल्हे (अपक्ष), बापू रावसाहेब कोल्हे (अपक्ष), राम अचुतराव शिंदे (अपक्ष), जगदीश बालासाहेब शिंदे (अपक्ष), अर्जुन रामराव साबळे (अपक्ष), अभिजित अनंतराव कदम (अपक्ष), प्रल्हाद दत्तराव पाटील (अपक्ष), भास्कर रामकिसन बेदरे (अपक्ष), मोहन जनार्दन कुलकर्णी (अपक्ष), अतिश बापूराव गरड (अपक्ष), संतोष मुंजाभाऊ गवळी (अपक्ष), तुकाराम धोंडीबा रुमाले (अपक्ष), द्यानेश्वर अचुतराव काळे (अपक्ष), मो.फह्याजोद्दीन मो. नवाजोद्दीन अन्सारी (ओ.इ. म.ए.इ.) संदीप सोपान दातरे (अपक्ष) व शेख मुस्ताक शेख रज्जाक आदींचा समावेश आहे.


