परभणी (प्रतिनिधी) मूळ परभणीचे रहिवाशी असलेले प्रसिद्ध गायक तथा संगीतकार विक्रम अशोक परळीकर यांचे मंगळवार दि 5 राजी रात्री 9.00 वाजता मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, मृत्यूसमयी ते 55 वर्षांचे होते
सुरवातीचे शिक्षण सुरमणी डॉ.कमलाकर परळीकर यांच्याकडे, नंतर मुंबईत पंडित अजित कडकडे यांच्याकडे झाले. नवी मुंबईत खारघर भागात ते स्वामी समर्थ संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. अनेक दिग्गज गायकांसोबत परळीकर यांनी साथ संगत केली तर अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमात सादरीकरण केले. कवी शाम यांनी लिहिलेल्या रचनांच्या ध्वनिफीत त्यांनी तयार केल्या असुन सलग दोन वेळेस तेरा तास दीर्घ गायनाचा त्यांचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. संगीत अलंकार ही पदवी परळीकर यांनी प्राप्त केली.अनेक विद्यार्थी घडवले.
दरम्यान विक्रम परळीकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, व एक मुलगी,भाऊ,बहिण असा मोठा परिवार आहे.
दैनिक लोकसंचार परिवार तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.


