दुसरे प्रशिक्षण पूर्ण ; कर्मचाऱ्यांची तयारी अंतिम टप्प्यात
परभणी (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे दोन सत्रामध्ये प्रशिक्षण येथील कृषी विद्यापीठात संपन्न झाली या प्रशिक्षणात 46 प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणासाठी दांडी मारली अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे
या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे , श्रीमती के हरिता , निवडणूक निरीक्षक यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे ,नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड,गणेश चव्हाण,अनिता वडवळकर,जिल्हा स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे,उमाजी बोथीकर, आम्रपाली कासोदकर, एम. ए. क्षीरसागर, विष्णू पकवाने, दिपक नागरगोजे आदींची उपस्थिती होती.मुख्य सभागृहाच्या समोर आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली होती. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी व मशीन हाताळण्याविषयीच्या शंका दूर व्हाव्यात त्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावलेले होते. त्याचप्रमाणे क्यू आर कोड च्या माध्यमातून मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचे वाचन साहित्य उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम देखील राबविण्यात आला.. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे ईव्हीएम hands on training, विविध नमुने भरून घेणे आणि परीक्षा देखील घेण्यात आली
46 कर्मचारी अनुपस्थित..
परभणी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्व PRO, FPO1 , PO2, PO3, OPO या कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात घेण्यात प्रशिक्षण घेण्यात आले. सकाळच्या सत्रात 983 पैकी 958 उपस्थित होते. तर 25 अनुपस्थित होते. दुपारच्या सत्रात 855 पैकी 934 उपस्थित होते तर 21अनुपस्थित होते. दोन्ही सत्रात मिळून 46 कर्मचारी अनुपस्थित होते.
टपाली मतदान पूर्ण
चारी विधानसभा मतदार संघासाठी निडणूक कार्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले. या चारही विधानसभा मतदार संघासाठी चार स्टॉल उभारण्यात आले होते.
सेल्फी पॉईंट व जनजागृती बॅनर
प्रशिक्षण स्थळी स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या वतीने विद्यापीठ परिसरात मतदान जनजागृती सेल्फी पॉइंट लावण्यात आले होते कर्मचाऱ्यांनी सेल्फीचा आनंद घेतला .. प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान करा अशा आशयाचे विविध बॅनरही
झळकत होते.
(छायाचित्र-उत्तम बोरसुरीकर)


