पालम (प्रतिनिधी) दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला गोपाष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी ही तिथी ९ नोव्हेंबर, शनिवारी संपन्न झाली.
या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते.जरी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो, परंतु मथुरा, वृंदावनमध्ये त्याची रौनक पाहण्यासारखी असते या दिनी सवत्स गोपूजन करण्यात येते श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम येथे सायंकाळी गोसेवकांच्या वतीने गोपुजन करण्यात आले.
यावेळी श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम चे सचिव गोसेवक अविनाश देविदासराव जोशी पालमकर यांच्या वतीने मंत्रोच्चार युक्त संकल्प करून सवत्स गौपूजन करण्यात आले
यावेळी सर्वप्रथम गोमाता संकल्प, गोमाता पूजन करून गोमातेस गोग्रास अर्पण करण्यात आला व गोआरती करण्यात आली व गोसेवकांना प्रसाद देण्यात आला
यावेळी भगवती स्वीट मार्ट गंगाखेड
येथील मदनसिंगजी राजपुरोहित
रामदेव हार्डवेअर अँड प्लायवूड गंगाखेड येथील दिनेश कुमारजी भाटी.श्री महालक्ष्मी स्टील सेंटर गंगाखेड येथील शिवलालजी पटेल.तुळजाई स्वीट मार्ट पालम येथील अमोल पाबळे यांच्या वतीने गोमातेस गुडलड्डू अर्पण करण्यात आले तथा लोहा येथील प्रसिध्द व्यापारी मनोहरजी जथी गोस्वामी समवेत परबतराज राजपुरोहित यांच्या वतीने पेंड रुपी गोग्रास अर्पण करण्यात आला यावेळी समवेत मिटू देवा देशपांडे,संतोष पत्की, विशाल नारलेवार, दत्तराम शिंदे,नारायण शर्मा,
बालाजी रूद्रवार,चौरे मामा, संतोष पांचाळ,नरहरी लोखंडे,अंकुश मोहिते,गौरव कुलकर्णी धानोरकर, प्रमोद इनामदार, संतोष पत्की,संतोष जोशी,तुकाराम ठाकरे, भुजंग मामा नावळे उपस्थित होते
सर्व गोसेवकांचे आभार श्री सद्गुरु बाळकृष्ण गोशाळा पालम चे सचिव अविनाश जोशी पालमकर यांनी मानले
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


