परिक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू
परभणी (प्रतिनिधी) राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परभणी मुख्यालयातील 12 उपकेंद्रावर रविवार दि. 1 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 ते 12 (पहिला पेपर) आणि दुपारी 3 ते 5 (दुसरा पेपर) दोन सत्रात होणार आहे.
जिल्ह्यातील 3 हजार 24 उमेदवारांची बैठक व्यवस्था 1) ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर रोड, परभणी 2) कै. रावसाहेब जामकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, जिंतूर रोड, परभणी 3) शारदा महाविद्यालय, सुभाष रोड, परभणी 4) बालविद्या मंदिर विद्यालय, नानलपेठ, शिवाजी पार्क, परभणी 5) श्री शिवाजी महाविद्यालय (ग्राऊंड फ्लोअर), वसमत रोड, परभणी 6) एन.व्ही.एस.मराठवाडा हायस्कूल, शिवाजी नगर, वसमत रोड, परभणी 7) गांधी विद्यालय, कृषी सारथी कॉलनी, वसमत रोड, परभणी 8) बालविद्या मंदिर हायस्कुल, वैभव नगर, देशमुख हॉटेल जवळ, परभणी 9) भारतीय बालविद्या मंदिर, ममता कॉलनी, कारेगाव रोड, परभणी 10) कै. मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्या मंदिर, श्रीहरी नगर, खानापूर फाट्याजवळ, परभणी 11) संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, वसमत रोड, परभणी 12) वसंतराव नाईक माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, सुपर कार्पेट जवळ, परभणी या 12 केंद्रांवर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
त्यानुषंगाने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमुद केले आहे. सदरील आदेश परिक्षार्थी/परिक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
सदरील आदेश दि. 01 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत लागु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.
*-*-*-*-*


