परभणी (प्रतिनिधी) शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांचे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आता नेते मंडळाच्या जाहीर सभा होत असून यातच महायुतीचे तसेच शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता खा. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अन्नपूर्णा लॉन्स जिंतूर रोड परभणी येथे या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महायुती तसेच तसेच शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.


