पालम (प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील आरखेड येथील गिरजाबाई लक्ष्मणराव दुधाटे (गोळेगावकर) यांचे शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या 87 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांच्या त्या पत्नी, गोदातीर समाचार चे संपादक ॲड.रमेशराव दुधाटे गोळेगावकर यांच्या चुलती, माजी सभापती श्रीमती चित्राताई दुधाटे गोळेगावकर यांच्या सासू आणि बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषारभैय्या गोळेगावकर, संचालक योगेश गोळेगावकर तसेच गिरीश सोळंके यांच्या आजी होत. त्यांच्या पार्थिवावर आज रविवार दिनांक-17 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता आरखेड (ता.पालम जि.परभणी) या ठिकाणी अंत्यसंकार करण्यात येणार आहेत. गोळेगावकर कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे.


