लम (प्रतिनिधी ) गंगाखेड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने गेल्या दोन ते तीन दिवसा पासुन शहरासह तालुक्यातील शेखराजुर, पारवा, पेठशिवणी, चाटोरी,
बनबस आदी गावासह शहरातील पठाण गल्ली, रोकडे गल्ली, सिरस्कर गल्ली, टेक गल्ली, ब्रम्हण गल्ली, नवा मोंढा, बस्टेशन आठवडी बाजार, शहराती मेन चौक या भागातुन पालम पोलिसांनी संयुक्तरित्या पथसंचलन केले. या वेळी पालम पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक सुरेश थोरात सह सशस्त्रधारी बि.एस.एफ चि तुकडी व पोलिस कर्मचारी सतीश दोंनकलवार, गणेश सवंडकर, के.एस.देवघरे, जमादार कल्यान साठे,विलास बळवते,शंकर कोलमवाड,बाबु सिंघनवाड आदी होते. निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पालम पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे.



