पालम (प्रतिनिधी) विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदाना वेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांसाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यावर मतदारांना मतदान करता येईल, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सदरील पुरावे ग्रहय धरले जाणार असल्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आव्हान पालम तहसीलदार तथा सहायक निवडणूक अधिकारी माहिती दिली आहे.
मतदार ओळख पत्रावर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र मतदार यादीत नाव असूनही ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदाराने पत्त्यात बदल केला असेल तर मात्र नवे ओळखपत्र मिळाले नसल्यास माहितीच्या ओळखपत्रावर मतदान करता येईल. मात्र त्याचे नाव बदललेल्या पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक असेल. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मनरेगा अंतर्गत दिलेले जॉब कार्ड, बँक पासबुक देण्यात आलेले छायाचित्रसह पासबुक, कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, निवृत्तीवेतनाचे दस्ताऐवज, केंद्र व राज्य, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपनी कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र, संसद विधानसभा विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले केंद्र सरकारचे विशेष ओळखपत्र आदी पुरावे ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा , कोणीही मतदानापासून वंचीत राहू नये यासाठीच 12पुरावे ग्रह्या धरले जाणार आहेत त्यामुळे मतदान करून मतदानाचा टक्का वाढववण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


