परभणी, (प्रतिनिधी ) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात सकाळी 7 ते 9 वाजेदरम्यान सरासरी 6.59 टक्के मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
परभणी जिल्ह्यातील 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघात 6.92 टक्के मतदान झाले असून, 96-परभणी विधानसभा मतदारसंघात 7.1 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 5.16 टक्के आणि 98- पाथरी विधानसभा मतदारसंघात 7.36 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे.
जिल्ह्याची टक्केवारी – 6.59%
मतदार संघ टक्केवारी
१) 95-जिंतूर – 6.92 %
२) 96-परभणी – 7.1%
३) 97-गंगाखेड- 5.16%
४) 98-पाथरी – 7.36%



