परभणी,(प्रतिनिधी) : येथील जिंतूर रोड प्रभाग क्रमांक 10 मधील शाहु नगर, भारत नगर व नेहरु नगरातील नागरीकांनी बुधवारी (दि.20) विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला.
महानगरपालिका प्रशासनाने गेल्या 40 वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधा पुरविल्या नाहीत, पिण्याकरीता पाणी नाही, पथदिवे नाहीत, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, रस्ते, नाल्या नसल्याने नागरिक हैराण होतें. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे नागरीकांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे या भागातील नागरीकांनी मतदानावरच बहिष्कार टाकून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या नागरीकांच्या बहिष्काराचा निर्णय कळाल्याबरोबर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नेमिनाथ दंडवते, उपअभियंता वसीम पठाण, सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, शाखा अभियंता राहुल धुतडे यांनी धाव घेवून नागरीकांबरोबर हितगुज केले. हा संपूर्ण परिसर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून आवश्यक कारवाई करीता त्यांच्याकडे पाठपुरावा होतो आहे. पाण्याचा निचरा होण्याकरीता तात्पुरत्या स्वरुपाची कच्ची नाली करुन देवू, असेही आश्वासन दिले. परंतु, नागरीकांनी या अनुषंगाने ओळीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. सातत्याने आश्वासने मिळाली आहेत, त्यापलिकडे काहीही झाले नाही, असे नागरीकांनी म्हटले. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत या भागातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


