परभणी (प्रतिनिधी) संविधान दिना निमित्त आज मंगळवार दि.26 रोजी परभणी शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त निमिनाथ दंडवते, उपायुक्त बबन तडवी, मुख्य लेखाधिकारी डॉ.प्रभाकर काळदोते, लेखा परिक्षक डॉ. श्रीरंग भुतडा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान दिना निमित्त अधिकारी, कर्मचारी समवेत संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी म.न.पा.लेखाधिकरी भगवान यादव, मुरारजी, सावंत, नगर सचिव विभागाचे विकास रत्नपारखे, संकिर्ण विभाग राजकुमार जाधव, शिक्षण विभाग मंजुर हसन, पाणी पुरवठा विभाग तन्वीर बेग, अदनान कादरी, माहीती व जनसंपर्क विभाग उमेश जाधव, कर्मचारी संघटना अध्यक्ष के.के.आंधळे, शेख मैहमुद, लेखा विभागचे रमेश चव्हाण, आदी अधिकारी, कर्मचारी मोठ़या संख्येने उपस्थित होते.
परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ कार्यालयातही सहायक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे, याच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. यावेळी जुबेर हाश्मी, गजानन यादव, नसीरोद्दीन काजी, खाजा मोईन खान, सुनील भराडे, कुणाल भारसाकळे, सर्ववसुली लिपीक व कर्मचारी उपस्थित होते. (छाया- उत्तम बोरसुरीकर)


