पालम (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड व्हावी या साठी नवसाला पावणारा मारुती भोगाव( तालुका पूर्णा) येथे महारुद्र अभिषेक करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत महायुती ला प्रचंड बहुमत मिळाल्या नंतर आता मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. यात प्रामुख्याने बीजेपी कडून ना.देवेंद्र फडणवीस तर शिवसेना कडून ना. एकनाथ शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. अजितदादा पवार गटाने फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसुन यावर चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र सर्वसामान्य कार्यकर्ते आपापल्या नेत्याने मुख्यमंत्री व्हायला पाहिजे यासाठी देवाकडे साकडे घालत आहेत. पालम तालुका शिवसेना कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी निवड व्हावी या साठी नवसाला पावणारा भोगाव चा मारुती भोगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे महारुद्र अभिषेक करण्यात आला.
यावेळी परभणी जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख परभणी सुरेश जाधव पाटील सोबत जिल्हाप्रमुख माधव कदम तालुकाप्रमुख कराळे तालुकाप्रमुख पौळ व समस्त शिवसैनिक व इतर मान्यवर उपस्थित होते



