परभणी (प्रतिनिधी) शहर महानगरपालिकेच्या DAY -NULM अंतर्गत परभणी शहरातील साखला प्लॉट, रेल्वे स्टेशन परिसर येथे परभणी शहरात आढळून येणा-या बेघर व्यक्तींसाठी सावली नावाचे बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलेले आहे. सदर बेघर निवारा केंद्र येथील सर्व व्यवस्था पाहण्यासाठी महानगरपालिके मार्फत सावली प्रतिष्ठान, परभणी या एजन्सीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सध्या या बेघर निवारा केंद्रात 30 बेघर व्यक्ती राहत असून असून त्यामध्ये 10 महिला व 20 पुरुष आहेत. यामध्ये बेघर व्यक्तींना राहण्यासाठी त्यांना स्वतंत्र कक्ष, पलंग, गादी, थंडीपासून बचाव करण्यासाठी गरम कपडे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच आंघोळीसाठी गरम पाणी व्यवस्था आहे. तसेच सकाळी 7 वाजता चहा 8.30 वा., नाष्ट्यामध्ये पोहे, उपमा, मटकी, शिरा, असे देण्यात असून दुपारी 1.30 वा. जेवण ज्यात वरण, भात, चपाती, भाजी, दुपारी 4 वाजता चहा आणि रात्री 7.30 जेवण ज्यामधे वरण, भात, चपाती, भाजी कधी खिचडी दिली जाते. महिला व पुरुष यांना मनोरंजनासाठी TV पाहण्याची व्यवस्था आहे.

सध्या थंडीच्या दिवसात महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर एकही व्यक्ती निवाऱ्याविना राहू नये, यासाठी रेल्वे स्टेशन, बसस्टँड व इतर ठिकाणी सर्वे करून अश्या बेघर व्यक्तींना निवाऱ्यात आणून वरीलप्रमाणे सेवा देण्यात येत आहेत. या ठिकाणी बेघरांना देण्यात येणा-या सुविधांची महापालिकेच्या वतीने वेळोवेळी पाहणी करून सुचना करण्यात येते.
सावली बेघर निवारा केंद्र परभणी शहर महानगरपालिका परभणी केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बेघर निवारा केंद्र सुरळीत सुरू आहे. या अनुषंगाने शहरातील बस स्टँड रेल्वे स्टेशन ब्रिज खाली सार्वजनिक स्थळी जे बेघर व्यक्ती आढळल्यास सावली बेघर निवारा केंद्र परभणी शहर महानगरपालिका परभणी सखला प्लॉट परभणी येथे पाठविण्याबाबत व्यवस्थापक ईखत्यार पठाण यांना हेल्प लाईन नं. 9420052125 वर संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव, अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते केले आहे.



