परभणी,(प्रतिनिधी) : येथील चतुरंग प्रतिष्ठानच्यावतीने 1 व 2 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत 1 डिसेंबर रोजी सौ. सिताबाई मोहिते व 2 डिसेंबर रोजी प्रा. गणेश शिंदे हे या दोघा वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे.
वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत 1 डिसेंबर रोजी सौ. सिताबाई मोहिते (जालना) या ‘मी केले तुम्ही करा, उद्योगाची कास धरा’ या विषयावर तर 2 डिसेंबर रोजी प्रा. गणेश शिंदे (अहिल्यानगर) हे ‘संत परंपरा व आजची पिढी’ या विषयावर विचार मांडणार आहेत.
यावर्षी व्याख्यानमालेचे हे 20वे वर्ष आहे. या व्याख्यानमालेत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणार्या वक्त्यांचा समावेश राहिला आहे.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


